Gauri Puja in Maharashtra, also known as Mangala Gauri Vrat, is an important ritual observed by married women, especially during the Ganesh Chaturthi festival. The festival is celebrated with great fervor and devotion, mainly in the Konkan region and among the Marathi-speaking community.
1. Timing:
2. Preparation:
3. Idol Installation:
4. Rituals and Pooja:
5. Fasting and Prayers:
6. Social Aspect:
7. Immersion:
8. Cultural Significance:
Gauri chi Gani – Traditional (Gauri Song)
दूध पिवळी साई
अंगणी तापते दूध पिवळी साई, लेखी गवरी बाई, एवढे जेवून जाई, २
आता काय करू बाई शंकर आले.साखळ्या ल्यायला उशीर झाला २
साखळ्या लेता सोनार कुठचा? माझ्या माहेरचा- माझ्या माहेरचा. 2
अंगणी तापते दूध ,पिवळी साई, लेखी गवरी बाई, एवढे जेवून जाई,
आता काय करू बाई शंकर आले, बांगड्या ल्यायला उशीर झाला,
बांगड्या लेता सोनार कुठे चा ? माझ्या माहेरचा माझ्या माहेरचा
अंगणी तापते दूध,पिवळी साई ,लेखी गवरी बाई, एवढे जेवून जाई,
आता काय करू बाई शंकर आले, डोरले ल्यायला उशीर झाला.
डोरलं लेता सोनार कुठे चा? माझ्या माहेरचा माझ्या माहेरचा.
अंगणी तापते दूध,पिवळी साई , लेखी गवरी बाई, एवढे जेवून जाई,
आता काय करू बाई शंकर आले. जोडवी ल्यायला उशीर झाला.
जोडवी लेता सोनार कुठेचा? माझ्या माहेरचा माझ्या माहेरचा.
अंगणी तापते दूध,पिवळी साई ,लेखी गवरी बाई, एवढे जेवून जाई,
आता काय करू बाई शंकर आले. पैंजण ल्यायला उशीर झाला.
पैंजण लेता सोनार कुठे चा? माझ्या माहेरचा माझ्या माहेरचा.
******************************
आली आली गौराई येथेच होती
आली आली गौराई येथेच होती,-२
नारळीच्या बनात गुतली होती-२
नारळीचे नारळ तोडत होती-२
सयांच्या ओठ्या भरत होती-२
आली आली गौराई येथेच होती-२
केळीच्या बनी गुतली होती -२
केळीच्या केळी तोडत होती -२
सयांच्या ओठ्या भरत होती-२
आली आली गौराई येतच होती-२
सुपारीच्या बनी गुतली होती -२
सुपारीच्या सुपाऱ्या तोडत होती -२
सयांच्या ओठ्या भरत होती -२
आली आली गौराई येतच होती -२
पेरवीच्या बने गुतली होती -२
पेरवीचे पेरू तोडत होती -२
सह यांच्या ओठ्या भरत होती-२
आली आली गौराई येतच होती-२
आंब्याच्या बनी गुतली होती -२
आंब्याचे आंबे तोडत होती -२
सयांच्या ओट्या भरत होती-२
******************************
आता गौरी जाशील कधी गौरी येशील...
आता गौरी जाशील कधी गौरी येशील,-२
पाऊस पडेल चिखल होईल
इन मी भादव्यात ग इमी भद्रव्यात ग-२
खरकीच्या बनामध्ये हाय मी तालुक्यात ग हाय मी तालुक्यात ग-२
आता गौरी जाशील कधी गौरी येशील,-२
पाऊस पडेल चिखल होईल
इन मी भादव्यात ग इमी भद्रव्यात ग-२
सुपारीच्या बनामध्ये हाय मी तालुक्यात ग हाय मी तालुक्यात ग-२
आता गौरी जाशील कधी गौरी येशील,-२
पाऊस पडेल चिखल होईल
इन मी भादव्यात ग इमी भद्रव्यात ग-२
नारळीच्या बनामध्ये हाय मी तालुक्यात ग हाय मी तालुक्यात ग-२
आता गौरी जाशील कधी गौरी येशील,-२
पाऊस पडेल चिखल होईल
इन मी भादव्यात ग इमी भद्रव्यात ग-२
बदामीच्या बनामध्ये हाय मी तालुक्यात ग हाय मी तालुक्यात ग-२
आता गौरी जाशील कधी गौरी येशील,-२
पाऊस पडेल चिखल होईल
इन मी भादव्यात ग इमी भद्रव्यात ग-२
आंब्याच्या बनामध्ये हाय मी तालुक्यात ग हाय मी तालुक्यात ग-२
******************************
सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला….
सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला -२
गवर आली माहेराला भाजी भाकरी जेवायला -२
भाजी भाकरी जेवली आणि रानमाळ फिरली-२
सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला -२
गवर आली माहेराला पुरणपोळी जेवायला
पुरणपोळी जेवली आणि रानमाळ फिरली
सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला -२
गवर आली माहेराला दहीभात जेवायला -२
दहीभात जेवली आणि रान माळ फिरली -२
******************************************
कराड कोल्हापूरच्या गौरी
कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी-२
सातार कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी-२
त्यांच्याग साखळ्यांचा नाद येतोय दुहेरी-२
कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी -२
सातार कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी-२
त्यांच्याग जोडव्यांचा नाद येतोय दुहेरी-२
कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी -२
सातार कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी -२
त्यांच्याग पैंजणांचा नाद येतोय दुहेरी-२
कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी -२
सातार कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी-२
त्यांच्याग बांगड्यांचा नाद येतोय दुहेरी-२
कराड कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी -२
सातार कोल्हापूरच्या गौरी आल्या त्या माहेरी-२
त्यांच्याग डोरल्याचा नाद येतोय दुहेरी-२
******************************
सोन्याच्या चौकटी….
सोन्याच्या चौकटी गौरी बाळातनी-२
बाळातनी बाई जागरण तुझं -२
जागता जागता पडल्या झापडी -२
गौराई आल्या पाहुनी खेळू साऱ्या राती -२
ठेवा ग हंडा पाणी गौराई माझी न्हाऊ दे-२
येळा ग साळी डाळी गौराई माझी जे वू दे-२
आता काय जेऊ बाई ग दारी शंकर हाय ग -२
शंकर सोळा राजा भोळा नगर सोडून जाईल -२
नगराला लागलं निशाण कापराच्या वाती -२
दिवा जळी दिवटी कापूर जळी वाती-२
गौराई आल्या पाहुनी खेळू साऱ्या राती-२
******************************************
ReplyForward |